Monday, March 18, 2019

An Empty Bench...

An Empty bench means an empty mind. It's very hard to keep our mind empty as we all are constantly thinking of something every time. Some thoughts just stick to our mind like rust and some just goes beyond the limits. Our thoughts are the key to our inner peace and happiness. The more it gets intense the more we get involved in it. When we disconnected from ourselves then we should realize that we are losing our mental virginity just to make others happy sacrificing our happiness. Remember who you are actually? Fun-loving, bubbly, confident, happy person? Just try to get yourself back, phases come and go but at the end, you will be only one with yourself first. Communicate with yourself daily, it doesn't matter how dramatic it feels but it's important. It's always better to be little dramatic instead of losing yourself for others. Nobody is perfect, you are awesome the way you are. Like attracts like, so try to always think positive and attract positivity. Be grateful that God wakes you up every morning, make him happy. God is nothing but positive energy within you. Cherish it. Feed yourself with some motivation and start working towards your goals. Believe in God's master plan. Do the unusual things which scares you  it will boost your confidence like go do rafting feel the thrill, dance like crazy , play with little kids, talk to your grandparents, try writing a poem for your mother, play a video game with your father and so on . It will definitely give you inner happiness. After all do not keep your bench empty, fill it with humor, happiness, enthusiasm, energy and with the people who love you the way you are.


 PS. Tried after so many days, open for feedbacks. Thank you.




 

Saturday, May 12, 2018

प्रेमाची गोष्ट भाग 5

  आज पासून विहंगची खरी तयारी होणार होती, ग्रुप लीडर ने त्यांना पहाटे ५ वाजता पार्वतीपायथ्याला बोलावले होते. विहंग बरोबर वेळेत पोहोचला . तिथे त्याच्या ग्रुप चे काही मेंबर्स आणि ग्रुप लीडर हि उपस्थित होते, १० मिनिटाने सर्वजण  आले आणि एकमेकांच्या ओळखीला सुरुवात झाली . त्यांच्या ग्रुप मध्ये २० जण  होते , वेगवेगळ्या वयोगटातले होते सगळे, काही हौशी तरुण, काही ४० वर्षांचे काका काकू, काही त्याच्या वयाचे . ग्रुप लीडर ने स्वतःची ओळख करून दिली आणि ट्रेक चा प्लॅन सांगितला . त्यांचा ग्रुप अगोदर मून  लेक म्हणजे चंद्र ताल  ला जाणार होता आणि नंतर सर पास  ला जाणार होता , हिमाचल  प्रदेशातील लाहौल घाटी प्रदेशात हा लेक  आहे . हिमालयावर अंदाजे ४३०० मीटर उंचीवर आहे . या लेक पासून चन्द्र नदीचा चा उगम होते जी पुढे जाऊन चंद्रभागा मध्ये मिळते आणि जम्मू काश्मीर मध्ये चेनाब म्हणून ओळखली जाते. एवढ्या उंचीवरचा लेक पाहायला सर्वजण खूप उत्सुक होते. चंद्र ताल ची खासियत हि होती कि  पौर्णिमेला तिथला नजारा काही औरच असायचा, आणि तसाच ट्रेक प्लॅन केला होता . वीस  दिवसांचा प्लॅन होता . जुजबी माहिती दिल्यानंतर लीडर ने फिसिकल  ट्रैनिंग सुरु केले . आधी वॉर्म उप , मग पार्वती चढून उतरून . फिसिकल ट्रैनिंग सोबत आणखीही काही माहिती लीडर सांगायचा. तातडी सुरक्षा कशी करायची ,  सोबत काय काय  आणि कसा घ्यायचा , तिथल्या हवामानाचा अंदाज. दुखापत झाली तर प्रथोमचार पेटी , अशी बराच अभ्यास करून घ्यायचा तो. विहंग ला हे खूपच इंटरेस्टिंग वाटत होता .  पुढचे ८ दिवस रोज वेगवेगळी ठिकाणी वेगवेगळी वेळी त्यांची फिसिकल  ट्रैनिंग होत असे . कधी सिंहगड सकाळी रात्री, कधी तोरणा अजून   बराच काही . शेवटचे २ दिवस पॅकिंग ला दिले होते . त्यांच्या अगोदर ची तुकडी ५ दिवस अगोदर पुढे गेली होती , पहिल्या तुकडीत नंदिनी होती आणि अजून बरेच अनुभवी लोक होती, विहंग ची तुकडी दुसरी होती आणि बरेच नवशिके होते . पहिले दहा दिवस त्यांनी चंद्र ताल प्लॅन केलेला मग फिटनेस लेवल पाहून निवडक लोक्कांना सर पास ला नेणार होते , कारण सर पास  ट्रेक थोडा अवघड होता . निघायचा दिवस होता, विमानाने ते दिल्ली ला जाणार होते आणि तिथून मनाली ला दुसरे विमान होते . विहंग ला सोडायला त्याचे आई , बाबा आणि मानसी आली होती. महत्वाचे फोने नंबर आई ला देऊन तो निघाला . आपल्या ग्रुप मध्ये जाऊन मिसळला , , ग्रुप लीडर ने हजेरी घेतली आणि सगळे विमानात बसले. विहंग च्या मनात आता चलबिचल सुरु झाली कारण तो खूप दिवसांनी नंदिनी ला भेटणार होता ..
    आपल्याला पाहून नंदिनी कशी रिऍक्ट करेल?, ती खुश होईल का? ती भेटल्यावर मी काय बोलू ?असे अनेक प्रश्न त्याच्या मनात होते. विचारांमध्ये वेळ कसा गेला कळलेच नाही त्याला, विमान दिल्ली मध्ये लँड झालं , तिथून एक तासाने मनाली साठी दुसरे विमान होते. यथावकाश सगळे मनाली ला पण पोहोचले . ग्रुप लीडर ने मानालीच्या एका  घरात सगळ्यांची राहायची व्यवस्था केली होती कारण ट्रेक्स सोबत तिथल्या लोकांची आणि त्यांच्या राहणीमानाचा पण ओळख व्हावी हा हेतू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुढे वाटचाल करणार होते आणि पहिल्या तुकडीला भेटणार होते, सकाळी 6 वाजता सगळ्यांना तयार राहायची सूचना देऊन ग्रुप लीडर निघून गेला.  त्यांना राहायला दिलेली जागा अतिशय सुंदर होती ,एक मोठा हॉल, हॉल ला लागून किचन, खाली 4 बेडरूम्स आणि वरच्या मजल्यावर 4 बेडरूम्स. बाहेर छोटं गार्डन.
पहिल्या मजल्यावर एक मोठी बाल्कनी जिथून बर्फाचे डोंगर आणि हिरवीगार झाडी दिसत होती. वर कौलांचे छप्पर , भिंती लाल मातीने सारवलेल्या. घरात जुन्या काळातले फर्निचर, प्रत्येक बेडरूम मध्ये एक मोठा डबल बेड आणि एक मोठा कपाट, बेड शेजारी मोठी खिडकी . जुनं पण निटनेटक ठेवलेला घर होता ते. रात्री चे जेवण आटपून सगळे थोड्यावेळ गप्पा मारत बसले होते, विहंग खूप कमी बोलत होता पण खूप काही शिकत होता. लोकांचे जीवनातले बरे वाईट विनोदी अनुभव नीट ऐकून घेत होता. रात्री तो त्याच्या बेडरूम मध्ये आला , त्याचा सोबती रोहन केव्हाच झोपून गेला होता, विहंग खिडकी बाहेरच्या सुंदर नजऱ्याकडे पाहत होता. आत्ता खूप वेळाने नंदिनीचे विचार मनात आले त्याच्या , " मी एवढा नंदिनी बद्दल विचार का करतोय?" शेवटी हा प्रश्न त्याच्या मनाला पडलाच , अनेक उलट सुलट प्रश्न उत्तर झाल्यावर त्याच्या मनाने स्वीकारलं की नंदिनी त्याला आवडायला लागली होती. .. (क्रमशः)

Sunday, May 06, 2018

प्रेमाची गोष्ट भाग 4

विहंग घरात आला  आणि आज चक्क सगळे कुटुंब एकत्र हॉल मध्ये बसले होते , विहंग ची जॉईंट फॅमिली होती, विहंगचे आजी आजोबा, आई बाबा, विहंगची एक लहान बहीण , काका काकू आणि त्यांची दोन मुले . असा मस्त मोठ्ठा कुटुंब होता. त्यांच्या घरात नेहमी धमाल चालायची सगळेच एकदम विनोदी होते. भावंडं मिळून पण खूप धमाल करायचे . मोठ्ठा कुटुंब असल्यामुळे घर हि मोठा बंगला होता. घरात सतत पै पाहुणा कारण आजोबांनी जिवाभावाची खूप लोक जोडून ठेवलेली . ती आता आवर्जून आजी आजोबांची खुशाली विचारायला यायची . घरात शैक्षणिक वातावरण , ज्ञान हीच मोठी संपत्ती मानणारे त्याचे बाबा नेहमीच त्याला प्रोत्साहन देत . आपल्या  मुलगा  उच्च शिक्षित व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि विहंगही खूप हुशार होता त्याला त्यांची इच्छा पूर्ण करायची होती . आजी , आई आणि काकू एकदम घट्ट मैत्रिणी होत्या . त्यामुळे भांडण वादविवाद झाले तरी पटकन संपून जात. विहंगचा काका त्याला एकदम मित्र सारखा , जिगरी दोस्तच ! बाकीची भावंडे लहान होती . विहंगची बहीण म्हणजे मानसी , होय ! नंदिनी ची बेस्ट मैत्रीण.    एकाच वर्गात होत्या दोघी . तर आज विहंग घरी आता आणि सगळ्यांनी मिळून त्याला एक छोटा गिफ्ट दिला एक पंधरा पाकीट,  विहंग विचार करू लागला काय  असेल यात  "अरे उघडून तर पहा आवडतंय का ते " काका म्हणाला. विहंग ने पाकीट उघडला त्यात एक कार्ड होता त्या कार्ड वर सुंदर हिरव्यागार डोंगराचे चित्र होते , खालून एक नदी वाहत होती आणि त्यावर लिहिला होता "हिमाचल प्रदेश " .  त्याने कार्ड उलट केला , मागे लिहिलेला "                         Himachal Pradesh trek for 20 days, we welcome you in our group." त्याला तर काई होतंय तेच कळत नव्हता , काका म्हणाला " अरे असा मठ्ठ सारखा काय पाहतोस , आम्ही ट्रेक ला पाठवतोय तुला हिमाचल ला २० दिवस, जा जिले अपनी जिंदगी " " अरे पण काका मला कुठे येतंय हे ट्रेक वगैरे  सगळं , पहिल्यांदाच ते पण हिमाचल ला कसा जाऊ मी ?" विहंग काळजी ने म्हणाला " अरे अजून १० दिवस वेळ आहे या दिवसात ते प्रॅक्टिस घेणारेत कच्चा खिळाडूंची " आजोबा गमतीने म्हणाले . मानसी म्हणाली " दादा आणि नंदू पण जाणारे या ट्रेक ला ती करेल ना तुझी मदत " नंदिनी चे नाव ऐकताच त्याच्या मनात एक वेगळी लहर उमटली , पण तिचा ग्रुप लवकर जाणार होता आणि हा  ग्रुप दोन मध्ये होता . आता तो मनापासून तयार होता फक्त फिटनेसची   तयारी बाकी होती . तरीपण १० दिवसात असा काय  उजेड पडणार होता ते त्याला पण माहित नव्हता . आता नंदिनी आणि विहंग दोघेही योगायोगाने लवकरच भेटणार होते .. आणि हे नंदिनी ला माहीतच नव्हते . . योगायोग किती सुरेख असतात. (क्रमशः )

Friday, May 04, 2018

प्रेमाची गोष्ट भाग 3

आज  दोघेही निवांत होते , ना अभ्यासाचं टेन्शन ना क्लास ला जाण्याची घाई . म्हणूनच कदाचित दोघेही शांत होते पण खूप काही बोलत होते . क्लास , शाळा सोडून ते पहिल्यांदाच बाहेर भेटत होते , ती छान आकाशी कलर चा टॉप घालून आणि ब्लू जीन्स घालून आलेली , केस मोकळे सोडले होते. नीट आवरून आली होती.  उजव्या गालावरची बारीकशी खळी  त्याने पहिल्यांदाच नोटीस केली. त्याने आत्तापर्यंत तिला दोन वेण्यांमध्येच पहिले होते . आज ती वेगळीच दिसत होती . त्याच्या मनांत चलबिचल सुरु झाली " खूप सुंदर दिसतेय  , कॉम्प्लिमेंट देऊ का तिला , तिला काही वेगळा तर वाटणार नाही ना ", "चाल ना काहीतरी खाउयात , खूप भूक लागलीये मला " तिच्या या वाक्याने त्याची विचारांची तंद्री भंगली. जवळच्या एका सँडविच च्या दुकानात ते गेले . ऑर्डर करून झाली . इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . सुट्टीचे प्लॅन्स बोलून झाले , बाकी मित्र मंडळी काय करतात ते बोलून झाले. दोघेही आता एकदम फ्रीली बोलत होते . २ तास कसे गेले कळलेच नाहीत त्यांना . " चाल मी आता निघते , उशीर होईल " नंदिनी म्हणाली . " परत कधी भेटणार ?" काही कळायच्या आत त्याच्या तोंडून हे वाक्य निघून गेले, मनातल्या  मनात जीभ चावली त्याने  . " अरे मी सांगायचं विसरलेच,  ४ दिवसांनी हिमाचल ट्रेक ला चाललीये २० दिवसांसाठी तेव्हा आल्यावर भेटू " मनातल्या भावना दडवत ती सहज बोलली . त्यावर तो फक्त "ओकाय , have a nice journey , सांभाळून जा , तू आल्यावर भेटू परत . " एवढाच बोलला.  नंदिनी घरी आली , रात्रीच्या वेळी जेवताना आई बाबांसोबत थोड्या गप्पा झाल्या . नंदिनी चे आई वडील एकदम साधे होते , घरपण एकदम साधं नीटनेटकं . दोघेही कमावते असल्यामुळे घरी बरीच बरकत होती पण पाय जमिनीवरच होते , कुठेही श्रीमंतीचा देखावा नाही कि बोलचाल नाही. नंदिनी ला पण हेच शिकवले होते त्यांनी उत्तम संस्कार आणि साधी जीवन सरणी. त्यांनी लहानपणा पासूनच तिला टेककिंग ची आवड निर्माण केली होती , वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ती तोरणा गडाचा यशस्वी ट्रेक करून अली होती . आणि आता हिमाचल ला जाणार होती , तिच्या सोबत अजून २० लोक पण होते , तो त्यांचा ट्रेकिंग चा ग्रुप च होता म्हणा ना. वयवर्ष ११ ते ५० या वयोगटातले होते सगळे , हीच सगळ्यांशी अगदी छान जमत होता ते हिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे. 
 
   तिकडे विहंग पण घरी पोहोचला पण घरी काहीतरी surprise होते त्याच्यासाठी ...  (क्रमशः )

Thursday, May 03, 2018

प्रेमाची गोष्ट। भाग 2

संध्याकाळी आय आय टी चे कलाससेस  सुरु झाले , त्यात ती पूर्ण गढून गेली,तिचा स्वप्नच होता ना आय आय टी engineer व्हायचा . आणि साधारण एक महिन्यानंतर तो तिला दिसला , अगदी अचानक तिच्याच क्लास मध्ये . मॅथ्स सॉल्व्ह  करत बसला होता . त्याला पाहून तिला आनंदाचा धक्का बसला. यावेळेस तिने ठरवलं कि स्वतः बोलायचं. ती त्याच्या जवळ गेली आणि हळू आवाजात Hi म्हणाली .  क्षण भर तो दचकलाच , तिला फार guilty वाटले कि उगाचच त्याची लिंक तोडली अभ्यासाची . तो काही बोलणार तेवढ्यात ती म्हणाली "सॉरी सॉरी , कर तू अभ्यास , आपण नंतर बोलू . " आणि त्याच्या रिप्लाय ची वाट ना पाहत निघून गेली . तो मनात म्हणाला "काई मुलगी आहे आता डिस्टर्ब केलाच आहे तर बोलायचं ना" आणि परत अभ्यासात गुंतून गेला .  ती सुद्धा क्लास अटेंड करून घरी जायला निघाली तोच पार्किंग मधून तिला बाहेर येताना तो दिसला तिला , तिने मुद्दाम पहिलाच नाही त्याच्याकडे . तोच त्याने तिच्यासमोर सायकल थांबवत तिला hi  म्हणाला . तिने सुद्धा मग छान smile देत हॅलो केला . तो म्हणाला " मगाशी न बोलताच काय  निघून गेलीस तू ", " अरे मला वाटलं तू डिस्टर्ब झालास म्हणून ... " तिचा वाक्य पूर्ण होऊ ना देताच तो म्हणाला " आता केलाच होतास डिस्टर्ब तर बोलायचं ना , गम्मत करतोय बरका , बोल काई बोलायचं होता " ती म्हणाली " काही नाही रे, सहज मला माहित नव्हता तू पण आय आय टी  ची तयारी करतोस ते "
" हो ग , मी तर दोन वर्षांपासून तयारी करतोय , तू याच वर्षी सुरु केली असशील ना ?" " हो ना , फार अवघड आहे यार , काही काही तर झेपताच नाही "  " हाहाहा , सुरुवातीला होता असा , नंतर समजेल सगळं, काही मदत लागली तर सांग, चल  मी निघतो, भेटू आता वरचे वर ". असा म्हणून तो निघून गेला , आणि ती तो जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिली . खूप खुश हो ती आज , तिला जाणवत होता तिच्या मूड मधला बदल पण असा अचानक मूड का बदलला माझा , तिचा तिलाच समजत नव्हता . घरी आली , आई बाबा अजून आले नव्हते . मस्त कॉफी पित गॅलरी मध्ये उभी होती . विचार ऑफकोर्स विहंग चाच . मनातून एकदम आनंदून गेलेली ती. आई घरी यायच्या आधीच दोघांसाठी चहा करून ठेवला , घर आवरून ठेवला. स्वतःची गाणं गुणगुणत काम चालली होती , आई बाबा आले . घर पाहून तर आई चक्कर यायची बाकी होती , "नंदू ने घर आवरला ???? क्या बात है !! मुलगी मोठी होतीये" . आई पण खुश.  रात्री जेवायला तिच्या आवडीचा  बेत केलेला आई ने . आज नंदिनी खूप खुश होती, तिच्या बोलण्यातूनच जाणवत होता ते. आई ला वाटलं एकदा विचारावं पण नंतर तिने विचार केला असेल काहीतरी कारण. जेवण गप्पा गोष्टीत मस्त झाला. नंदिनी तिच्या बेडरूम मध्ये आली  झोपायला . आता जरा निवांत वेळ मिळाला तिला . स्वतःशीच बोलत होती " का  मला आज वेगळा वाटतंय? , विहंग शी बोलून मी एवढी  खुश का आहे ?, इतरही मित्र आहेत कि माझे एवढा वेगळा वाटत नाही पण त्त्यांच्याशी  बोलताना   ?काळात नाहींये " सगळेच प्रश्न अनुत्तरीत . विचार करता करती तिला झोप लागली .
  आता हळू हळू दिवस जात होते. दिवसाबरोबर त्यांचा भेटणं सुद्धा वाढतहोता . दोघे एकत्र अभ्यास करायला लागले, ती तिचे प्रश्न त्याला विचारायची आणि तो solve करायचा . आता त्यांची मैत्री एकदम छान झालेली . एकमेकांची मस्करी करणे, खोड्या काढणे सुरु होते. अशातच वर्ष कसा गेला कळलंच नाही . आणि त्याची दहावीची परीक्षा तोंडावर आली. तो जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवू लागला आणि ती सुद्धा त्याला डिस्टर्ब करत नव्हती. तत्याची दहावीची परीक्षा संपली आणि हिची सुरु झाली. त्यामुळे महिनाभर दोघांनाही भेट, बोलणंच झाला नव्हता . यथावकाश  तिची परीक्षा पण संपली.  आता ती दोघेही  वाट पाहू लागली एकमेकांच्या भेटीची , हो, तो सुद्धा . त्याला सुद्धा तिच्याबद्दल काहीतरी वाटत असणार नक्कीच ...क्रमशः

Wednesday, May 02, 2018

प्रेमाची गोष्ट

प्रेमाची  गोष्ट ...

(नावे काल्पनिक आहेत)

भाग 1
 
पावसाळ्याच्या दिवसात शाळा सुरु झाली, सगळीकडे शाळेत नुसते उत्साहाचे वातावरण होते . खूप दिवसांनी  आपले लाडके मित्र मैत्रीण भेटणार म्हणून सगळेच खुश होते. रंगीबेरंगी रेनकोटस , छत्र्या सगळीकडे नाचत होत्या. काही जण  नवीन पुस्तकांचा सुगंध घेत होते. स्टाफरूम मध्ये सुट्टीत कुठे कुठे फिरून आलो ह्याच्यावर चर्चा रंगली होती , एकूणच आनंदाचे वातावरण होते . तिची नजर मात्र कुणाला तरी शोधात होती , मैत्रिणींच्या गप्पांमध्ये तिचा लक्ष नव्हता , भिरभिऱ्या नजरेने ती सगळीकडे पाहत होती. ती म्हणजे नंदिनी साठे. काळेभोर डोळे, थोडस नकटं नाक, गव्हाळ वर्ण आणि पाठीवर रुळणाऱ्या दोन मोठ्या वेण्या. उंची आणि अंगकाठी शोभेल अशी. त्यावेळी ती होती आठवीत, अभ्यासात हुशार ,घराची एकुलती एक म्हणून थोडी लाडावलेली पण समजूतदारसुद्धा. तर ... ती शोधात होती त्याला, तो विहंग कुलकर्णी, दहावीच्या वर्गातला . उंच , गोरापान , डोळ्यांवर चष्मा असलेला , अभ्यासात अति हुशार. तिची आणि त्याची ओळख वार्षिक परीक्षेच्या वेळी झालेली . पेपर देताना सोबत बसायचे दोघे, दोन वर्षांनी मोठा होता ना तो . आता या वर्षी दहावी होती त्याची . तेव्हापासून पूर्ण मे महिन्याची सुट्टी नंदिनीने त्याच्या विचारात घालवली होती आणि आज तो दिवस उगवला होता ज्याची ती खूप दिवसांपासून वाट पाहत होती . पण तो काही अजून आला नव्हता . शेवटी ती कंटाळून वर्गात निघून बाकावर जाऊन बसली आणि तोच खिडकीतून तो दिसला, धावत पळत धापा टाकत आलेला . तिच्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा उमटली. ती पाहताच होती त्याला एकटक तोच मानसीने तिला हलविले . मानसी तिची घट्ट मैत्रीण ,तिच्यापासून नंदिनी काहीच लपवत नसे पण हि गोष्ट मात्र तिने सांगितली नव्हती . का कोण जाणे पण तिचा तिला कळतच नव्हता कि तिच्या मनात नक्की विहंग बद्दल काई आहे. आता ती तास संपायची वाट पाहू लागली ....
   अर्धा तास कसा गेला कळलंच नाही तिला आणि तास संपला . काहीतरी काम काढून ती वर्गाच्या बाहेर आली , आणि आशेने त्याच्या वर्गाच्या दिशेने पाहू लागली पण तो काही बाहेर आला नाही . बिचारी उदास होऊन परत वर्गात जाऊन बसली, तिच्या  मनातली घालमेल तिलाच समजत नव्हती. आयुष्यात गोंधळलेली कधीच नव्हती ती. मनाला समजून घालून पुढचा दिवस ढकलला . आज एक आठवडा होऊन गेला तरीसुद्धा त्यांच्या काही बोलणं झाला नव्हता . ती सुद्धा नवीन वर्ष्याच्या अभ्यासात गुंतून गेली , संध्याकाळी आय आय टी चे कलाससेस  सुरु झाले